आदम खान सर्वोत्तम बचावपटू गौरांग उच्चुकर उत्कृष्ट खेळाडू, रितेश कदम उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : टिळकवाडी येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ शिवाजी कॉलनी आयोजित दुसऱ्या दिलीप कोल्हापुरे स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने एम. व्ही हेरवाडकरचा 1-0 असा निसटता पराभव करून दिलीप कोल्हापूरे चषक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू गौरांग उच्चुकर तर उत्कृष्ट गोलरक्षक रितेश कदम याना गौरविण्यात आले. टिळकवाडीतील सुभाष चंद्रबोस (लेले)मैदानावर झालेल्या मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हेरवाडकरने संतमीराचा 1-0 असा पराभव केला. हेरवाडकर तर्फे शशांक वेर्णेकरच्या पासवर ऋषभ बलाळने गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झेवियर्सने केव्ही-2 चा 5-0 असा पराभव केला. झेवियर्स तर्फे गौरांग उच्चुकरने 3 तर आदम खान व रूजन उचगांकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
अंतिम सामन्यात आदम खान याने नोंदवलेल्या एकमेव विजयी गोलावर सेंट झेवियर स्कूलने एम.व्ही.हेरवाडकर हायस्कूल संघावर 1-0 असा चुरशीच्या सामन्यात निसटता विजय संपादन केला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा व चुरशीचा झाला. पूर्वार्धात खेळाच्या 19 व्या मिनिटाला सेंट झेवियर्स हायस्कूलच्या सिद्धारूढ सानिकोपने कॉर्नर किकवर लाथाडलेल्या अचूक चेंडूवर आदम खानने हेडरद्वारे गोल करून 1-0 ची आघाडी मिळवुन दिली. त्यानंतर हेरवाडकरने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्याना यश आले नाही. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण, राकेश कांबळे, पवन कांबळे, जॅकी मस्करनेस, श्रीकांत फगरे, वसंत हेब्बाळकर, बाबासाहेब शरदवाडे, प्रशांत पवार, किरण महावीर, विनायक धामणेकर, शिरीष चौगुले, संतोष दळवी, सागर भोसले, विशाल राऊत, जयराम बांदेकर, मनोज खांडेकर, किशोर पोटजाळे, विक्रम कदम यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक घेऊन गौरवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट गोलरक्षक रितेश कदम हेरवाडकर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सेंट झेवियर्सचा गौरांग उच्चुकर, सर्वोत्कृष्ट बचावपटू हा पुरस्कार सेंट झेवियरचा आदम खान यांना आकर्षक चषक घेऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून उमेश मजुकर, कौशिक पाटील, यश सुतार, अखिलेश अष्टेकर, सुदर्शन पाटील यांनी काम पाहिले.









