Dilip Bhalekar felicitated by Parit Samaj for announcing the National Samajbhushan Award
परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी (परीट) महासंघाच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर व माजी अध्यक्ष मनोहर रेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परीट समाजाची तालुक्याची मीटिंग घेण्यात आली व यावेळी परीट समाजाच्या कार्यकारणीत काही फेरबदल करून 3 वर्षासाठी तालुक्याची नवीन कार्यकरणी करण्यात आली.
यावेळी राजू भालेकर यांची परीट समाजाच्या तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली उपाध्यक्ष संदीप बांदेकर, स्वप्निल कदम, सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर,सह सेक्रेटरी सुरेंद्र कासकर,खजिनदार जितेंद्र मोरजकर,सह खजिनदार रितेश चव्हाण,शहराध्यक्ष दयानंद रेडकर,जिल्हा कार्यकारणीवर सदस्य संजय होडावडेकर, प्रदीप भालेकर,भगवान वाडकर, तालुका कार्यकारणीवर सदस्य योगेश आरोलकर, प्रकाश लोकळे यांची निवड करण्यात आली.
परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांची फेर निवड झाल्याबद्दल व इतर कार्यकरणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी / प्रतिनिधी









