काही मिनिटांच्या अवधीनंतरच्या घटनेने सारेच चकित
रत्नागिरी
तालुक्यातील कोतवडेतील दिलीप रामाणे या प्रौढाच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आह़े ज्या ठिकाणी दिलीपचा मृतदेह आढळला होता, त्या ठिकाणच्या मार्गावरून गावातील देवतेची पालखी मार्गस्थ झाली होत़ी यानंतर काही मिनिटांच्या अंतराने दिलीप यांचा खून झाल्याचे तपासात समोर आले आह़े उत्सवाच्या गजबजलेल्या या वातावरणात दिलीप यांचा खून करून मारेकरी पालखीसोबतच्या घोळक्यात मिसळल्याची जोरदार चर्चा कोतवडे गावात आह़े
दिलीप रामचंद्र रामाणे (58, ऱा कोतवडे लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आह़े दिलीप यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीतील मृतदेह 17 मार्च रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कोतवडे कुंभारवाडी परिसरात आढळल्यानंतर कोतवडे गावात खळबळ उडाली होत़ी दिलीप याचा खून नेमका कुणी केला, या बाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आह़े मागील 10 दिवसांपासून रत्नागिरी ग्रामीण पोलीस कोतवडे परिसरात कसून तपास करत आहेत़ असे असतानाही कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाह़ी
दिलीप याचा खून झाला, त्या दिवशी कुंभारवाडी येथून पालखी वाडय़ा-वस्त्यांवर फिरत होत़ी 17 मार्च रोजी सायंकाळी दिलीप यांचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणाहून पालखी मार्गस्थ झाली होत़ी यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ या पालखीसोबत होत़े पालखी निघून जाताच काही वेळानंतर दिलीप यांचा खून करण्यात आल़ा मात्र पालखीसोबत असलेल्यांना या खूनाची खबर कशी लागली नाही, या बाबत आश्चर्य व्यक्त होत आह़े
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून दिलीप यांच्या खून प्रकरणात सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आह़े तसेच मोठय़ा संख्येने टिपणे पोलिसांनी घेतली आहेत़ मात्र अद्याप कोणताही ठोस धागादोरा पोलिसांना मिळालेला नाह़ी दिलीप याला दारू पिण्याचे व्यसन लक्षात घेता त्याच्यासोबत असणाऱया लोकांची पोलीस चौकशी करत आहेत़ मात्र यामधूनही पोलिसांच्या हाती काही लागले नसल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळावरून हातातील कडे जप्त
दिलीप रामाणे यांचा मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी पोलिसांना एक हातातील कडे आढळून आले आह़े हे कडे पोलिसांकडून जप्त करण्यात आले, मात्र हे कडे मारेकऱयाचे असावे, या बाबत साशंकता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आह़े









