बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेसाएफसी गोवाने, बालगोपाळ कोल्हापूर, माहीरा केरळ संघांचा तर दिलबहार कोल्हापूरने योनापोव्हा बंगळूर संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. सुभाषचंद्र लेले मैदानावर गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून पहिल्या समान्यात सेसाएफसी गोवा व माहिरा एफसी केरळ यांच्यात सामना झाला. निर्धारीत वेळेत 40 व्या मिनिटाला सीसीच्या फ्रासीसने पहिला गोल केला तर 58 मि. ला रामकृष्णाने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये सेसाएफसी गोवाने 5-2 असा पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात बालगोपाळ कोल्हापूर संघाने राहुल के.आर. शेट्टी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आल्याने गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 57 व्या मिनिटाला बालगोपाळच्या मनिकानंद मुरगन याने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. के. आर. शेट्टी संघाला या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात युनापोव्हा मंगळूर संघाने बीटाएफसी पुणेचा टायब्रेकरमध्ये 4-1 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये योनापोव्हा मंगळूर संघाने 4-1 असा टायब्रेकरमध्ये पराभव केला. योनापोव्हा मंगळूरतर्फे श्री, थॉमास, अल्बर्ट व राजन यांनी गोल केले तर पुणेतर्फे शैलेशने गोल केला.
चौथ्या सामन्यात सीसा गोवा संघाने बालगोपाळ कोल्हापूरचा 4-2 अशा टायब्रेकरमध्ये पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर निमयाचा वापर केला. सीसा गोवातर्फे रिचर्ड, मार्टीन, इजोफिओ व अँथोनी यांनी गोल केले तर मनिकानंद मुरगन व श्रीकांत यांनी गोल केले. पाचव्या समान्यात दिलबहार कोल्हापूर संघाने योनापोव्हा मंगळूरचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 21 व्या मिनिटाला दिलबहारच्या दिगेशच्या पासवर स्वयम साळुंखेने 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनिटाला योनापोव्होच्या थॉमसने गोल करण्याची संधी वाया दवडले. 59 व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयमने मारलेला वेगवान फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. शेवटी हा सामना दिलबहार कोल्हापूरने 1-0 असा पराभव केला.









