वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील दीक्षा जितेंद्र शिरगावकर हिची दि.१७ जून ते २५ जून रोजी जर्मनी- बर्लीन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.
या जागतिक स्पर्धेत दिक्षा २५ व ५० मीटर फ्रीस्टाईल याप्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. या निवडीमुळे तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे. विशेष ऑलिम्पिकसाठी भारतातून विविध १६ प्रकारांमध्ये एकूण २८५ खेळाडूची निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून जलतरणासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये दीक्षाचा समावेश आहे. यामुळे कोडोली- वारणानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दिक्षाला हा पल्ला पार करणे सोपी गोष्ट नव्हती ती विशेष चाईल्ड आहे. जन्मतः एका वैद्यकीय अपघातात तिच्या काही क्षमतेचा -हास झाला. दीक्षाचे वडील जितेंद्र सिव्हिल इंजिनियर तर आई प्रज्ञा प्राध्यापिका आहे. दीक्षाने आतापर्यंत जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळवले आहे.ह्या वर्षभरामध्ये बेंगलोर मंड्या, गुजरात गांधीनगर, व दिल्ली येथे असे तीन प्रीप्रेटरी कॅम्प झालेत त्यामधून तिची निवड सन २०२३ ला जर्मनी बर्लीन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकसाठी निवड झाली
दीक्षाला तिचे प्रशिक्षक अभय डांगे यांचे मार्गदर्शन लाभले आणि शाळा चैतन्य विशेष चाइल्ड स्कूल वारणानगर च्या मुख्याध्यापिका अंजना माने व स्टाफ, स्पेशल ऑलंपिक कोल्हापूर क्षेत्रीयच्या मुख्य दीक्षित, विशेष ऑलंपिक महाराष्ट्र प्रदेशचा मुख्य हंसिनी, तसेच मारुती बावडेकर,या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. आणि वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले.