वृत्तसंस्था / लखनौ
आपल्या नोटबूक सेलेब्रेशनमुळे वारंवार चर्चेत राहणाऱ्या दिग्वेश राठी याला पुन्हा एकदा ‘टिक द नोटबूक’ सेलेब्रेशन भोवले आहे. आयपीएल मंडळाने त्याच्यावर एका सामन्याची बंदी तर या सामन्यातील त्याच्या मानधनातील 50 टक्के रक्कम कपात करण्याची कारवाई केली आहे.
सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यावेळी सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने 20 चेंडूत 59 धावा ठोकल्या. त्यात 6 षटकारांचा समावेश होता. दिग्वेश राठीने अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर नोटबूक’ सेलेब्रेशन करुन आचारसंहितेचा भंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राठीला पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली.
याच कारणासाठी कारवाई होण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. त्याच्या नावावर पाच डीमेरिट पॉईंट जमा झाल्यामुळे त्याला अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या लखनौ जायंट्सच्या पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वीही दिग्वेश राठीला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामनावेळीही त्याला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. दिग्वेशला आता 22 मे दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या गुजरात टायट्न्सविरुद्धच्या सामन्यासाठी निलंबीत केले आहे. दिग्वेशने 12 सामन्यात 8.18 च्या सरासरीने 14 बळी घेतले आहेत. मागील कारवाईनंतर त्याच्या वर्तणुकीत काही फरक झाल्याचे दिसत नाही. त्याचा नोटबूक सेलेब्रेशनचा हा प्रकार प्रसारमाध्यमांवर बराच व्हायरल झाला आहे.









