वार्ताहर/ हलशी
नंदगड येथील महालक्ष्मी यात्रा 12 फेब्रुवारीपासून होणार आहे. या निमित्त यात्रेसाठी निधी संकलनाचे काम सुरू आहे. आजच्या डिजिटल युगात पावती पुस्तके न वापरता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून निधी संकलन करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असून सर्व व्यवहार डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. सर्व व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटलचा वापर करण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
यात्रेच्या खर्चाचा ताळमेळ आणि निधी संकलन यामधून होणारे आर्थिक व्यवहार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असताना कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये म्हणून आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर बनविण्यात आली आहे. आनंद शानभाग, सॉफ्टवेअर डेव्हलपर, बेळगाव यांच्याकडून सदर सॉफ्टवेअर बनवून घेण्यात आले आहे. ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी उत्सव कार्यालयांमध्ये नवीन संगणक, सॉफ्टवेअर डिजिटल कमिटीकडे सुपूर्द केले आहे.
यावेळी शिवाजी पाटील यांच्या हस्ते नवीन संगणक आणि सॉफ्टवेअरची पूजा करून उदघाटन करण्यात आले. यानंतर ज्या कुणा भाविकांना देणगी द्यायची असल्यास देणगी दिल्यानंतर डिजिटल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून येणारी पावतीच घ्यावी असे उत्सव कमिटीकडून कळविण्यात येत आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, डिजिटल कमिटीचे अध्यक्ष महादेव हलशीकर, राजू पाटील, राजेंद्र लक्केबैलकर, रायनगौड देमेटी, मोरेश्वर मुन्नवळळी, अमित वाली, वैभव हणमशेट, डिजिटल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.









