कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात केंद्र सरकारचा निर्णय, 5 वर्षे तरी नोकऱ्यांना धोका नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या या युगात केंद्र सरकार नागरीकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रेशखर यांनी केले आहे. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणत्याही तंत्रज्ञानामुळे नागरीकांची माहिती सुरक्षा धोक्यात येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी योग्य ती पावले केंद्र सरकार उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानापासून आपण अलग राहू शकणार नाही. या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील तंत्रज्ञान वातावरणाचे संवर्धन होण्यासाठी अनुकूलच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ओपनएआय’ कंपनीचे कार्यकारी प्रमुख सॅम अल्टमन यांच्याशी बोलताना केले होते. भारताला या तंत्रज्ञानाचा स्वीकार करुनच पुढे जावे लागेल, अशी भारत सरकारचीही भूमिका आहे. मात्र, कोणतेही नवे तंत्रज्ञान जेव्हा अवतरत असते तेव्हा लोकांच्या मनात शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या संबंधातही होत आहे, असे मतप्रदर्शन या क्षेत्रातील अनेक तंत्रज्ञांनीही केलेले आहे.
चिंता नोकऱ्या कमी होण्याची
कृत्रिम बुद्धंाrमत्ता तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर होईल, असे चिंता व्यक्त करण्यात येते. ती काही प्रमाणात खरी आहे, असे अल्टमास यांनी स्पष्ट केले. मात्र, जितक्या प्रमाणात हे होईल असे बोलले जाते, तसे होणार नाही. या तंत्रज्ञानामुळे काही नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होणार नाही, हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानामुळे नवी अधिक चांगली कामेही निर्माण होणार आहेत. त्यामुळे विशेष चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही तंत्रज्ञानामुळे काही विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या गमावल्या जातात. पण अनेक नव्या नोकऱ्या निर्माणही होतात. त्यामुळे विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही. परिवर्तन स्वीकारण्यास आपण तयार असणे आवश्यक आहे, हा मुद्दा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मांडला आहे.
वर्ल्ड वाईड वेबमध्येही परिवर्तन
सध्या वर्ल्ड वाईड वेब हे तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. त्यातही नजीकच्या भविष्यकाळात परिवर्तन होणार आहे. त्याच्याजागी वेब 3 हे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. या नव्या तंत्रज्ञानात विकेंद्रीकरण, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि टोकन बेस्ड इकॉनॉमिक्स या नव्या संकल्पनांचा अंतर्भाव आहे. सध्या इंटरनेवर अतिरेक आणि गुन्हेगारी यांचे थैमान आहे. अशा परिस्थितीत नवे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान येत आहे. मात्र, त्यामुळे नोकऱ्यांवर गदा येणार नाही. निदान पुढची पाच वर्षे तरी नोकऱ्यांना कोणताही धोका नाही, असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे.
डाटा सुरक्षा सुनिश्चित
कोणतेही तंत्रज्ञान आले तरी नागरीकांची व्यक्तीगत माहिती आणि खासगीत्व यांना धोका होऊ दिला जाणार नाही. इंटरनेटवरील त्यांची माहिती सुरक्षित राहील. त्यासाठी विविध सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच परिस्थिती पाहून नव्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे काही तोटे असले तरी लाभ मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी, तोट्यांचा बाऊ करुन त्याकडे पाठ फिरवणे योग्य ठरणार नाही, असेही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
नवा कायदा करणार
नागरीकांची माहिती सुरक्षित रहावी, यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा करणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो संसदेसमोर सादर करण्यात येणार आहे. या नव्या कायद्यात नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार असलेल्या सर्व समस्यांवरील तोडगा उपलब्ध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धीमत्ता कितपत लाभदायक ?
ड कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे याचेही लाभ आणि तोटे शक्य
ड नागरीकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कायदा करणार
ड योग्य दक्षता घेऊनच नव्या तंत्रज्ञानाचा देशाकडून स्वीकार होणार
ड कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान नाकारल्यास देशाची अधिक हानी शक्य









