भाग ः 4
आपल्याला माहित आहेच की, डेबिट कार्ड किंवा पेडिट कार्ड वापरून व्यवहार केले जातात. ही कार्ड्स ज्या मशिनवर स्किम केली जातात त्याला point of sale (POS) असे म्हणतात. हे एक असे मशिन आहे जे आपले कार्डचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरते. इथेच आपण किरकोळ खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करतो. विक्रीच्या वेळी, व्यापारी ग्राहकांना रक्कम सांगतो. ग्राहकांसाठी त्या रकमेचे एखादे बील तयार करून (जे कॅश रजिस्टर पिंटआउट असू शकते), आणि ग्राहकांनी पैसे भरण्याचे पर्याय सांगतो. ग्राहक ज्या वस्तूंच्या बदल्यात किंवा सेवेच्या तरतूदीनंतर व्यापाऱयास पैसे देतात. हे पैसे देण्यासाठी कार्डचा वापर होतो. पैसे म्हणजे कार्ड स्वॅप केल्यानंतर, पेमेंट प्राप्त झाल्यानंतर, व्यापारी व्यवहाराची एक पावती ग्राहकांना देतात. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या मोबाईलवर ह्या व्यवहारासंबंधी बँकेकडून एक मेसेज येतो. हे सर्व ह्या मशिनद्वारे केले जाते.
हे POS Systems मध्ये हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर असते. जेव्हा ग्राहक पीओएस सिस्टममध्ये पेडिट किंवा डेबिट कार्ड वापरतात तेव्हा कार्डच्या चुंबकीय पट्टय़ावर संग्रहित केलेली माहिती एकत्रित डिव्हाइसद्वारे संकलित केली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. मॅग्नेटीक पट्टीवर लिहिलेला डेटा ट्रक 1 आणि ट्रक 2 डेटा म्हणून असतो. ट्रक 1 डेटा ही खात्याशी संबंधित माहिती असते आणि त्यात कार्डधारकांचे नाव तसेच खाते क्रमांक याचा समावेश असतो तर ट्रक 2 डेटामध्ये पेडिट कार्ड नंबर आणि कालबाह्यता तारखेची माहिती असते. सध्या नवीन आलेल्या कार्डमध्ये मॅग्नेटीक पट्टी ऐवजी चिप बसवलेली असते.
इथेही फसवणूकीला वाव आहे. पॉस मालवेयरद्वारे फसवणूक होऊ शकते. पॉईंट-ऑफ-सेल मालवेयर (पीओएस मालवेयर) हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर (मालवेयर) आहे जे हॅकर्सकडून पॉईंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्सला टेलिफोनद्वारे जोडून पेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती मिळवितात. रिटेल चेकआउट पॉईंटवरून डिव्हाइस मेमरी वाचून हे फ्रॉड केले जातात.
स्किमिंग-स्किमिंग ही युझरची ओळख असणारी वैयक्तिक माहिती (पीन नंबर, आयडी, सीव्हीव्ही) हस्तगत करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. स्किमर एक लहान डिव्हाइस आहे जे पेडिट/डेबिट कार्ड स्कॅन करते आणि चुंबकीय पट्टीमध्ये किंवा चीपमध्ये असलेली माहिती स्टोअर करुन ठेवते. नंतर ही माहिती दुसऱया कार्डवर कॉपी करुन हे कार्ड आर्थिक व्यवहार करण्यास वापरले जातात.
सुरक्षित संरक्षण कसे कराल
पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमच्या मालक आणि ऑपरेटरनी पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याकडील सर्व लॉगचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. पॉईंट-ऑफ-सेल सेवा प्रदान करणाऱया संस्था आणि व्यापाऱयांनी नियमितपणे सर्व व्यवहार व तयार झालेले लॉग तपासणे आवश्यक आहे. मॅन्युअली न करता ते सिस्टीमद्वारे होणे आवश्यक आहे.
बऱयाचदा सिस्टीम बिघाड झाला आहे असे भासवून रिमोट पध्दतीने (दुसऱया ठिकाणी बसलेल्या व्यक्ती एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे आपल्या मशिनचा ताबा घेणे) ताबा घेतात अशा अनोळखी व्यक्तीला ऍक्सेसची परवानगी देऊ नये. या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सायबर गुन्हेगार पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमवरील रिमोट ऍक्सेस कान्फिगरेशनचे सेटींग करू शकतात. पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमचा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, नेटवर्कवर रिमोट ऍक्सेसला परवानगी देऊ नका.
अँटीव्हायरस वापरणे-पॉईंट-ऑफ-सेल नेटवर्क प्रभावी होण्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम सतत अपडेट ठेवावे.
इंटरनेटवर ऍक्सेस बंद करा- राउटर कान्फिगरेशन करुन अनधिकृत ऍक्सेस पॉईंट-ऑफ-सेल डिव्हाइसवर वर नियंत्रित करा.
फायरवॉल इन्स्टॉल करा- बाहेरील हल्ल्यांपासून पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमचे संरक्षण करण्यासाठी फायरवॉलचा वापर करा. पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमशी तडजोड करण्यासाठी डिझाइन केलेले हॅकर्स, व्हायरस, वर्म्स किंवा इतर प्रकारच्या मालवेयरना अनधिकृत प्रवेशास फायरवॉलमुळे प्रतिबंध होतो.
व्यापाऱयांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतेही व्यवहार न करता व्यवहार पूर्ण झाला म्हणून मोबाईलचा स्क्रिन दाखवला जाऊ शकतो. डमी कार्डचा विशेष करुन पेडिटकार्डचा वापर होऊ शकतो हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.
लॉग तपासा-पॉईंट-ऑफ-सेल सेवा प्रदान करणाऱया संस्था आणि व्यापारी यांनी नियमितपणे कोणत्याही सिस्टम लॉगचे पुनरावलोकन करणे.
पॉईंट-ऑफ-सेल सॉफ्टवेअर अपडेट करा- पॉईंट-ऑफ-सेल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरसह नियमितपणे अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
स्ट्राँग पासवर्ड वापरा-सर्व पॉईंट-विक्री-डिव्हाइस मालकांनी खात्याचे नाव युनिक ठेवावे तसेच गुंतागुंतीचा पासवर्ड सेट करावा. तसेच पॉइंट-ऑफ-सेल सिस्टमचे पासवर्ड नियमित बदलत राहावे. पॉईंट-ऑफ-सेल सिस्टमसह कोणतीही इलेक्ट्रॉनिक/चुंबकीय उपकरणे संलग्न केलेली नाहीत याची खात्री करा.
व्यापाऱयांनी त्यांचे सर्व वायफाय आणि इंटरनेट कनेक्शन सुरक्षित असल्याची खात्री करणे व आपल्या नेटवर्कचे नाव युनिक वापरुन एक चांगला गुंतागुंतीचा पासवर्ड त्यांच्या वाय-फाय नेटवर्कला वापरावा.
काम झाल्यावर अकाऊंट नेहमी लॉग-आऊट करा. चुकीच्या लॉगिन प्रयत्नांनंतर अकाऊंट लॉग-इनसाठी बंद करण्याचे सेटिंग्स वापरा.
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल- https://cybercrime.gov.in यावर नोंद करता येते तसेच हेल्पलाइन क्रमांक 155260 वर डायल करून किंवा ऑफलाईन तक्रार आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल करू शकता. किंवा जर आपल्याला काही फसवणूकीचे एसएमएस, ई-मेल, लिंक्स, फोन कॉल आपल्या संवेदनशील वैयक्तिक माहितीसाठी किंवा बँकेचा तपशील विचारण्यासाठी आला तर महाराष्ट्र सायबरच्या खालील वेब पोर्टलवर नोंद करु शकता.https://www.mhcyber.gov.in/ या पोर्टलवर करता येते व इथे सर्व माहिती ही उपलब्ध आहे.
-विनायक राजाध्यक्ष








