विविध चौकातील डिजिटल फलक बंद
बेळगाव : शहरामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विविध चौकांमध्ये डिजिटल फलक उभारले. मात्र, ते आता बंद आहेत. तर काही फलकांसमोर झाडांच्या फांद्या आल्याने ते दिसेनासे झाले आहेत. तेव्हा तातडीने ते फलक सुरू करावेत, तसेच फांद्या हटवाव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृतीसाठी या फलकांची उभारणी केली आहे. परिसरामध्ये स्वच्छता राखावी, वाहने सावकाश चालवावीत, वाहतूक नियम पाळावेत, आरोग्य सांभाळण्याबाबत या डिजिटल फलकांद्वारे जनतेला सूचना केल्या जातात. मात्र, आता हे सर्वच डिजिटल फलक बंद आहेत. किल्ला तलावाजवळील सम्राट अशोक चौक, रावसाहेब गोगटे सर्कल, गोवावेस या परिसरातील फलक बंद आहेत. तेव्हा ते फलक सुरू करणे गरजेचे आहे.









