आमदार असिफ सेठ यांच्या फंडातून विकासकामे
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्या फंडातून सोमवारी खडक गल्ली येथे कूपनलिकेची खोदाई करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील विविध समस्यांचा आमदारांनी आढावा घेतला. नागरिकांनी मांडलेल्या समस्या लवकर दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी खडक गल्ली, काकतीवेस या परिसरातील समस्या आमदारांना सांगितल्या. पिण्याचे पाणी, गटारी, रस्ते यासह इतर सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पुरविल्या जातील, असे ते म्हणाले. याबरोबरच रविवारी त्यांनी आझमनगर परिसरात दौरा करून तेथील समस्याही जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.









