आमदार सेठ यांच्या फंडातून विकासकाम
बेळगाव : कणबर्गी रोड, रुक्मिणीनगर येथे आमदार असिफ सेठ यांच्या फंडातून कूपनलिकेची खोदाई करण्यात आली. या कूपनलिकांमुळे रुक्मिणीनगर परिसरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यात येणार आहे. युवा नेते अमन सेठ यांच्या हस्ते कूपनलिकेचे पूजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार असिफ सेठ यांनी रुक्मिणीनगर येथे जनता दरबार घेतला होता. यावेळी तेथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. पाण्यासोबतच रस्ता, गटारी, ड्रेनेज सुविधा पुरविण्याची मागणी तेथील महिलांनी केली होती. याची दखल घेत आमदारांनी याठिकाणी कूपनलिकेची खोदाई करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर रामतीर्थनगर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्याच्या दुरस्तीसोबतच डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.









