वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करतात. काहीजण तर जेवण सोडून देतात. तर वजन घटवण्यासाठी उपाशी राहतात. उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होत नाही.वजन लवकर वाढत जाते पण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. वजन घटवण्यासाठी कोणत्याही शाॅर्टकटचा वापर करु नये. बर्याच वेळा हे शाॅर्टकट्स शरीरासाठी अपायकारक असतात.
वजन घटण्याकरिता संतुलित आहार घेणे आवश्यक असते. काहीजण वजन कमी करण्यासाठी कडक डाएट पाळतात. आणि स्वतःचे नुकसान करुन घेतात. दिवसभर काम करण्यासाठी शरीराला पोषक घटकांची गरज असते. योग्य आहार न घेतल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
आहारासाठी तिन सूत्र आहेत
लंच
नाश्ता
डिनर
ह्या तिन्ही गोष्टीपैकी एकही चुकवता कामा नये
सर्वप्रथम व्यायाम महत्वाचा
शक्यतो सकाळी ७ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान व्यायाम करावा. व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मअप करायला विसरू नका. वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे व्हायला मदत होते आणि व्यायामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही. रोज किमान २५ मिनिटं व्यायाम करावा. २५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ व्यायाम करायचा असल्यास काहीच हरकत नाही.
उपाशी पोटी उकळलेले पाणी प्यायल्यामुळे वजन कमी करता येते. उकळलेल्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळणे अधिक फायदेशीर असते. गरम पाण्यामध्ये साखर टाकू नये. एक कप गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मध टाकून प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्येचे प्रमाण कमी होते.
ब्रेकफास्टमधील पदार्थ :
उकडलेली अंडी
Sprouts ( भिजवलेली मटकी, मुग)
इडली
उपमा
फळे
Dry fruits
लंच
दुपारचा लंच कधीही स्किप करु नये.भाकरी भाजी , कोशिंबीर असा आहार घ्यावा.लंचमध्ये सलाद खाणे फायदेशीर असते. सलादमध्ये काकडी, कोबी, गाजर, पनीर, चीज, बीट, पालक असेपदार्थ असावेत. मांसाहार करत असल्यास तुम्ही उकडलेल्या चिकनचे काही तुकडे सलादमध्ये मिक्स करु शकता
टी ब्रेक
लोकांना संध्याकाळी 4-5 च्या आसपास चहा किंवा काॅफी प्यायला आवडते. भारतामधील बहुतांश लोकांना संध्याकाळी चहा/ कॉफी पिण्याची सवय लागलेली आहे. वजन कमी करायचे असल्यास ही सवय मोडावी लागेल. पण ब्लॅक कॉफी घेऊ शकता.स्नॅक्समध्ये शेव, शेंगदाणे किंवा उकडलेले चणे खावेत. मीठ, टाॅमेटो, कांदा टाकून यांची पौष्टिक भेळ बनवून खावी.
डिनर
डिनर हा एकदम हलका असावा. वरण भात, पालेभाजी भाकरी चालते. सूप सुद्धा घेऊ शकता.रात्री सुर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्यानंतर लगेच जेवण करावे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









