शाळेच्या कामकाजासह शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक
ओटवणे प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जि.प.च्या प्रमुख शिक्षण, प्रशिक्षण संस्था अर्थात डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी माडखोल केंद्र शाळा नं १ ला अचानक भेट देत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह दर्जा सोयीसुविधा व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच विशेषतः शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या टीम वर्कचे कौतुक केले.यावेळी प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी अध्ययन स्तर कार्यवाही आणि प्रत्यक्ष विद्यार्थी प्रतिसाद याची पडताळणी केली. तसेच या शाळेतील मुलांचे सुंदर लेखन कौशल्य, वाचन क्षमता पाहून सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच सर्व टीम वर्क करत असताना यात इतरांना प्रेरित करून शैक्षणिक कार्यात कसे सहभागी व्हायचे हा आदर्श माडखोल केंद्रात पहायला मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच माडखोल केंद्राचे कुशल नेतृत्व केंद्र प्रमुख रामचंद्र वालावलकर यांच्या बद्दल गौरवोद्गार काढूनअध्ययन निष्षत्ती नुसार मार्गदर्शनसह चावडी वाचन’ उत्कृष्ट घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांना. अध्ययन स्तर पडताळणी कशी महत्वाची आहे. हे सांगताना वाचन, लेखन संख्या, क्रिया यातील अनेक बारकावे समजावून दिले यावेळी दीपक पंडित यांनी फिच्युरिस्टीक वर्गाचे सादरीकरण केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद राऊळ, सदस्य विजय राऊळ यांच्याहस्ते राजेंद्र कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. रश्मी सावंत, विलास फाले, स्वप्नजा खानोलकर, अंजली मुळीक यांच्यासह माडखोल केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.









