दापोली :
तालुक्यातील हर्णे येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सुमारे ३० हजार लिटर डिझेलसह ४७ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दापोली पोलिसांनी जप्त केला. रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
हर्णे जेटी येथे अवैधरित्या डिझेलची तस्करी केली जात असल्याची माहिती गुप्त यंत्रणेद्वारे दापोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेले तीन दिवस पोलीस समुद्रावरील संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
अखेरीस रविवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. वामन पोशिराम रघुवीर, (३७ रा. हर्णे), हातीन केसरीनाथ कोळी (३४), दर्शन अनंतकोळी, (३५ दोघे रा. बोडणी, रेवस ता. अलिबाग), संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (३२), शिव्य प्रमोद मिसाद (१९, दोघे रा. झापराबाद, जोनपूर, उत्तर प्रदेश) अशी या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.








