सप्टेंबरमध्ये 5.81 दशलक्ष टन डिझेलचा वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या सप्टेंबर महिन्यात पावसामुळे डिझेलच्या विक्रीत काहीशी नरमाई पाहायला मिळाली. सप्टेंबरमध्ये डिझेल विक्री 3 टक्के इतकी घटलेली पाहायला मिळाली. औद्योगिक क्षेत्रातल्या हालचाली देशातल्या काही भागात मंदावल्याने डिझेल विक्रीवर त्याचा परिणाम पहायला मिळाला. दुसरीकडे पेट्रोलची विक्री मात्र सप्टेंबरमध्ये वाढली आहे. सप्टेंबरमध्ये 5.81 दशलक्ष टन इतक्या डिझेलचा वापर करण्यात आला. मागच्या वर्षी याच महिन्यात ही मागणी 5.99 दशलक्ष टन इतकी होती.
एप्रिल, मेमध्ये वाढ
कृषी क्षेत्रातल्या हालचाली एप्रिल आणि मेमध्ये वाढल्या होत्या, त्यावेळी डिझेलचा वापर दोन्ही महिन्यात अनुक्रमे 6.7 टक्के, 9.3 टक्के इतका वाढला होता. उन्हाळा असह्या असल्याने कारचालकांनी एसीचा वापर केल्यानेही डिझेलची मागणी त्या महिन्यांमध्ये वाढलेली होती. पेट्रोलची विक्री सप्टेंबरमध्ये 5.4 टक्के वाढून 2.8 दशलक्ष टन इतकी झाली होती.









