Purity of Ghee : सणासुदीचा हंगाम सुरू होताच बाजारात भेसळयुक्त मालाचा काळाबाजार सुरू होतो.मग ते मिठाई असो किंवा तूप मोठ्या प्रमाणात भेसळ होतेचं. खरे तर सणासुदीच्या काळात या सर्व खाद्यपदार्थांचा खप वाढत असतो. त्यासाठी व्यापारी भेसळयुक्त वस्तूंचा अवलंब करू लागतात.ज्याच्या सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.अशावेळी तुपाची शुध्दता कशी तपासायची याची माहिती देणार आहोत.

तुम्ही जेव्हा बाजारातून तूप खरेदी करता तेव्हा त्याची सत्यता तपासण्यासाठी पहिल्यांदा ते तळहातावर घ्या. आता तुपाला हलकसे चोळून बघा. जर तुप हातात लगेच वितळले तर समजा तूप ओरिजनल आहे.परंतु तसे झाले नाही तर लगेच दुकानदाराला परत करा.

तुम्ही जेव्हा तूप खरेदी करता तेव्हा त्यामध्ये दोन चमचे मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर तुपाचा रंग बदलला तर समजा तूप बनावट आहे.

या दोन पर्याया नंतर तिसरा पर्याय म्हणजे खरेदी केलेल्या तुपात साखर मिसळा. साखर आणि तुप याचे मिश्रण एकत्र करत असताना जर तुपाचा रंग लाल झाला तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजा.









