ऑनलाईन टीम तरुण भारत :
रांची येथील रॉक गार्डन हे शहरातील तसेच राज्यातील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.
रांचीमधील प्रसिद्ध रॉक गार्डन हे ‘अल्बर्ट-अक्का’ चौकापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे. जयपूरच्या बागेनंतर रांची रॉक गार्डन देशात महत्त्व आणि प्रसिद्धीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रांची मधील रॉक गार्डन गोंडा टेकडीच्या खडकांपासून बनवले गेले. झारखंडच्या राजधानीत असलेल्या या रॉक गार्डनमध्ये लोखंडी रॉडपासून बनवलेला झोपाळा आहे. विविध प्रकारची शिल्पे आणि धबधबे या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात. रांचीच्या रॉक गार्डन जवळ कानके धरणाचा तलाव आहे.
अनंत मनमोहक क्षितिज आणि निसर्गाच्या या अद्भुत आविष्कारमुळे या बागेला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. रॉक गार्डनचा उल्लेख देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून केला जातो. रांची शहराच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणामुळे रॉक गार्डनमध्ये येणारे लोक जवळपासच्या परिसरात असलेल्या इतर पर्यटन स्थळांना देखील भेट देतात.