अमिताभ बच्चन अन् निमरत कौर मुख्य भूमिकेत
अभिनेत्री डायना पेंटी अलिकडेच शाहिद कपूरसोबत ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटात दिसून आली होती. आता तिने स्वत:च्या पुढील चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. डायना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सेक्शन 84’ या चित्रपटात दिसून येणार आहे. अभिनेत्रीने सेटवरील काही छायाचित्र शेअर केली ओत.

हा चित्रपट माझ्यासाठी अविश्वसनीय स्वरुपात विशेष प्रवास ठरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मला पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रारंभी मी अत्यंत गोंधळून गेले होते, परंतु काही काळानंतर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला राहिला. अमिताभ बच्चन यांना काम करताना पाहणे खरोखरच अद्भूत आहे असे उद्गार तिने काढले आहेत.
या चित्रपटात डायना पेंटी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत निमरत कौर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता यांनी केले आहे. दासगुप्ता यांनी यापूर्वी 2014 मध्ये ‘युद्ध’ आणि 2015 मध्ये ‘तीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अमिताभ बच्चन हे लवकरच ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात प्रभास, दीपिका पदूकोन आणि दिशा पाटनी यांच्यासोबत दिसून येणार आहेत.









