गुजरातमधील सूरत शहराची ओळख हिरेव्यापारामुळे निर्माण झाली आहे. येथे हिऱ्यांनी तयार झालेल्या दागिन्यांची देशविदेशात मोठी मागणी आहे. आता सूरतचे ज्वेलर्स हिऱ्यांची कवळी तयार करत आहेत. कमालीची गोष्ट म्हणजे विदेशात या कवळींना मोठ्या संख्येत ग्राहकही मिळू लागले आहेत. हिऱ्यांच्या या कवळीची किंमत 25-40 लाख रुपयांपर्यंत आहे.

हिऱ्याद्वारे तयार झालेल्या या कवळीत एकूण 16दात आहेत. वरच्या आणि खालील जबड्यात प्रत्येकी 8 दातांच्या जोडीद्वारे हा डेंचर तयार केला जात आहे. या डेंचरमध्ये सोने आणि चांदीसोबत सुमारे 2 हजार हिरे जडविण्यात आले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार या डेंचरमध्ये बदल केले जात आहेत. काही ग्राहक हार्टशेपच्या दातांचा सेट इच्छित आहेत. तर काही जणांना गन शेपचा दातांचा सेट हवा असतो. सोने आणि चांदीचे दागिने अन् अंगठ्या घालण्यापुरती आता शौक मर्यादित राहिलेला नाही. हिरेजडित चष्मे देखील मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. हिऱ्यांचा डेंचर वापरण्याचा प्रकार सुरू केला आहे. या डेंचरांमध्ये चांदीसोबत 10, 14 आणि 18 कॅरेट गोल्डचा वापर होत आहे. चांदीत मॉजोनाइट डायमंडचा 16 दातांचा सेट सुमारे लाख रुपयांचा आहे. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या सेटची किंमत 5 लाख रुपये आहे. 25-40 लाख रुपयांचा देखील दातांचा सेट असून त्याचे वजन 25-40 ग्रॅमपर्यंत असते. विदेशात अशाप्रकारच्या डेंचरांची मोठी मागणी आहे.









