वृत्तसंस्था/कतार
दोहा येथे 16 मेपासून डायमंड लीग स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत ऑलिम्पिक पदकविजेत्या नीरज चोप्रासह भारताचे तीन खेळांडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत गतवर्षी भारताच्या नीरज चोप्राने 88.36 मीटर भालाफेक करीत रौप्य मिळविले तर 2023 मध्ये 88.67 मी. भालाफेक करीत सुवर्णपदक पटकविले होते. 2023 मधील आशियाई स्पर्धेतील रौप्यविजेता आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविणारा किशोर जेनाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 27.00.22 मि. पूर्ण करीत नवा राष्ट्रीय विक्रम करणारा भारताचा गुलवीर सिंग या डायमंड लीगमध्ये 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. भारताची उदयोन्मुख धावपटू पारुल चौधरी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेणार आहे. तिने 3000 मे. स्टीपलचेस शर्यत 9 मिनिटांत पूर्ण केली आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू आहे.









