रोट्रॅक्ट क्लब-विजयकांत डेअरीचे सहकार्य
बेळगाव : विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर येथे एवाययू (आयू) फाऊंडेशन, रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट क्लब आणि विजयकांत डेअरी अँड फूड प्रॉडक्ट्स लि. (किंग आइस्क्रीम) यांच्या सहकार्याने अत्याधुनिक डायलेसिस युनिट सुरू करण्यात आले आहे. 25 लाख रुपये खर्चातून अत्याधुनिक उपकरणे येथे बसविण्यात आली आहेत. अवघ्या 700 रुपयांमध्ये डायलेसिस सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या सेंटरचे उद्घाटन विजयकांत डेअरीच्या संचालक दीपा सिदनाळ व विजयकांत सिदनाळ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला रोट्रॅक्ट क्लबचे निखिल चिंडक, आयू फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. मनोज सुतार, सचिव निलेश पाटील, राजश्री पाटील, डॉ. नेत्रा सुतार यासह इतर उपस्थित होते. विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. रवी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सेंटरमध्ये अत्याधुनिक डायलेसिस मशीन, अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध असून 24 तास सेवा दिली जाणार आहे. विजया ऑर्थोमधून आतापर्यंत उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात आल्या असून न्युरो सर्जरी, स्पाईन सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट, ऑर्थोस्कोपी, मेडिसिन, जनरल सर्जरी यासारख्या सेवा एकाच छताखाली मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी केतन शिंदे, मोनिका असुंडी, नितीन मुंदडा, महेश शिंदे, गौरव जोशी यासह इतर उपस्थित होते.









