प्रतिनिधी,कोल्हापूर
कोणाच्याही तब्येतीची एखादी तक्रार उदभवते. साहजिकच मधुमेह आहे का या शक्यतेने आता रक्ताचीही तपासणी केली जाते. आणि अनपेक्षित अशा एखाद्या प्रसंगात, धक्क्यात रक्त तपासणीत मधुमेह असल्याचे दिसते. अर्थात मधुमेहाच्या एका तपासणीत पूर्ण निदान करणे अशक्य असते. मात्र आपल्याला मधुमेह आहे या धक्क्याने अनेकांची अवस्था गोंधळाची बनवून जाते. त्या पार्श्वभूमीवर खरोखर आपल्याला गेल्या तीन महिन्यात आपल्या शरीरात मधुमेहाची नेमकी स्थिती काय होती याचे मोफत निदान एच बी ए वन सी या तपासणी द्वारे करून घेण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.
मधुमेह मुक्त अभियानाचे जगन्नाथ दीक्षित संचलित आडोर ट्रस्ट व कोल्हापूर डायबिटीस रिव्हर्सल सेंटर यांच्यावतीने या मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 20 एप्रिल या कालावधीत मंगलधाम हॉल बिन खांबी गणेश मंदिराजवळ, येथे हे शिबिर होणार आहे. त्यात एक हजार जणांची मोफत तपासणी करण्याचे संयोजकांचे नियोजन आहे.
यासंदर्भात डायबिटीस रिव्हर्स सेंटरचे प्रमुख अजय खतकर यांनी सांगितले की, भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. पण त्यापैकी 50 टक्के लोक अर्धवट माहितीवर आपले मत बनवतात. काहीजण आपल्याला मधुमेह नाही याच समजुतीत वावरत असतात. काहीजण मधुमेहाची नको इतकी भीती बाळगून राहत असतात. आपल्या ज्ञानाने काही औषधे घेत असतात. मधुमेह प्राथमिक टप्प्यात असताना त्यावर उपचार किंवा आहार विहारात बदल केले तर ते उपयोगी ठरते. पण अनेक जण गुंतागुंत वाढून गेल्यावर उपचाराला सुरुवात करतात.
या पार्श्वभूमीवर आपल्याला मधुमेह आहे किंवा नाही हे लोकांना नेमकेपणाने कळावे. मधुमेह असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या डॉक्टरकडून किंवा डायबिटीस रिव्हर्सल सेंटर कडून उपचार घ्यावेत. मधुमेह नसेल तर योग्य त्या खबरदारी घेत उर्वरित जीवन आनंदाने जगावे यासाठी (एच बी ए वन सी) हीमधुमेह तपासणीची पद्धत उपयोगी ठरते. त्यात गेल्या तीन महिन्यातील आपल्या शरीरातील रक्तात शुगरच्या कमी जास्त झालेल्या प्रमाणाची सरासरी कळते व मधुमेहाबद्दलचे, त्याच्या नेमक्या टप्प्याचे निदान करता येते. आणि हीच तपासणी मोफत केली जाणार आहे. 13 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात रोज सकाळी आठ ते 11 या वेळेत मंगलधाम हॉल. बिन खांबी गणेश मंदिराजवळ येथे ही तपासणी होणार आहे.
जागरूकता महत्वाची
मधुमेह गुंतागुंतीचा आजार आहे. अर्थात औषध, आहार ,विहार याद्वारे तो नियंत्रित ठेवता येतो. आमच्या संस्थेद्वारे मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. लोकांनी निष्कारण घाबरून जाऊ नये. आहार विहाराचे पालन करून मधुमेहाला रोखावे यासाठीच आमचे पूर्ण निशुल्क असे सर्व प्रयत्न आहेत.
अजय खतकर,डायबेटिस रिव्हर्सल सेंटर, कोल्हापूर.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









