वृत्तसंस्था/मुंबई
येथे सुरू असलेल्या पश्चिम भारत बिलियर्डस आणि स्नुकर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विजेते आणि तीनवेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या ध्रुव सितवालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अशोक शाँडिल्यचा पराभव केला.
सितवालाने शाँडिल्यचा 524-457 गुणांनी पराभव करताना 89 आणि 83 गुणांचे ब्रेक्स नोंदविले. ही स्पर्धा मुंबईच्या खार जिमखान्यामध्ये सुरू आहे. अन्य एका सामन्यात एस. श्रीकृष्णाने मेहुल सुतारीयाचा 744-295 गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्रीकृष्णाने तीन शतकी ब्रेक्स नोंदविले.
वरिष्ठांच्या स्नुकर विभागातील तिसऱ्या फेरीतील सामन्यात लक्ष्मण रावतने शशी पटेलचा 4-0 अशा फ्रेम्समध्ये पराभव केला. स्पर्श फेरवाणीने या स्पर्धेत तिसरी फेरी गाठली.









