नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रो लिमिटेडने धुव आनंद यांची जपानमधील मुख्य व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नेमणूक केली आहे. त्यामुळे जपानमधील कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी धुव हे स्वतंत्रपणे पाहणार आहेत. आयटी उद्योगात ध्रुव यांना सुमारे 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. डिजिटल इंजिनियरिंग, आयओटी व आघाडीवरच्या तंत्रज्ञानाविषयी त्यांना उत्तम ज्ञान अवगत आहे.









