वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आयपीएलच्या सर्वकालिन सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 2008 साली आयपीएल स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर या स्पर्धेला संपूर्ण जगातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात यशस्वी स्पर्धा म्हणून सध्या ओळखली जाते.
आयपीएलच्या सर्वकालिन सर्वोत्तम संघाच्या निवडीची जबाबदारी वासिम अक्रम, मॅथ्यू हेडन, टॉम मुडी आणि डेल स्टिन या माजी क्रिकेटपटूंवर सोपविण्यात आली होती. या निवड प्रक्रियेमध्ये सुमारे 70 क्रीडा पत्रकारांचाही समावेश होता.
आयपीएलच्या सर्वकालिन सर्वोत्तम संघाचे नेतृत्व धोनीकडे असून या संघात विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशिद खान, सुनिल नरेन, यजुवेंद्र चहल, मलिंगा आणि बुमराह यांचा समावेश आहे.









