पुरवठा साखळी भक्कम करण्याची योजना
मुंबई
लॉजिस्टीक क्षेत्रातील कंपनी डीएचएल पुरवठा साखळीसाठी आगामी पाच वर्षाच्या कालावधीत भारतात 50 कोटी युरो (सुमारे 4,000 कोटी) गुंतवणार आहे. या विस्ताराव्यतिरिक्त, डीएचएलची एकूण क्षमता 2026 पर्यंत सुमारे 2.2 दशलक्ष चौरस फुटांपर्यंत वाढवण्यासाठी त्याच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये 1.2 दशलक्ष चौरस फूट वेअरहाऊस जागा जोडण्याची योजना आहे, असे कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.
ई-कॉमर्स, रिटेल, ग्राहक, उत्पादन तसेच ऑटोमोटिव्ह यांसारख्या वाढत्या क्षेत्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे बेंगळूर, चेन्नई, कोलकाता, मुंबई, एनसीआर आणि पुणे या प्रमुख महानगरांमध्ये साठवणुकीच्या जागा आहेत. यात 1.2 कोटी चौरस फूट क्षमतेची भर पडणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच राज्यांच्या राजधानीत आणि बद्दी, कोचीन, कोईमतूर, गुवाहाटी, सानंद, इंदूर, लखनौ, भुवनेश्वर, होसूर आणि विशाखापट्टणम यांसारख्या टियर-2 शहरांमध्ये मल्टी-क्लायंट साइट्स तयार केल्या जात आहेत. कंपनीने म्हटले आहे की 2026 पर्यंत भारतातील कर्मचारी संख्या दुप्पट करून सुमारे 25,000 पर्यंत नेण्याची योजना आहे. जेणेकरुन अनेकांना नव्याने रोजगार मिळेल.
‘़आम्ही भारताबद्दल दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतो कारण येथील व्यवसायांना आशावादी असण्याची अनेक कारणे आहेत,’ टेरी रायन, सीईओ, एशिया पॅसिफिक, डीएचएल पुरवठा साखळी यावेळी म्हणाले आहेत.









