प्रतिनिधी /तिसवाडी
गावांतवाडा कुंभारजुवे येथे धे धेणलो धेणल्या पावस शेणलो म्हणत ढोल ताशांच्या गजरात धेणलो उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री महादेव ब्रहमानंद मंदिरासमोरील श्री थापणेश्वर मंदिर श्री रामायसती मंदिर, श्री रामपुरूष मंदिर, आणि शेवटी परत महादेव ब्रहमानंद मंदिराजवळ आल्यानंतर रात्रौ धेणलोची सांगता झाली.
सर्व प्रथम पाडव्याची पारंपारिक लोकगीते, ढोल ताशांच्या गजरात धेणलो मंदिरासमोर आणला. गावांतवाडा कुंभारजुवे येथील कलाकार भानुदास सुर्या बेतकीकर व नवनाथ सुर्या बेतकीकर या दोन्ही कलाकारांनी अब्दागीर, मारूती व गुढय़ा आणून दिल्यानंतर धेणलोची सजावट करण्यात येते. श्री थापणेश्वर मंदिरासमोर राजू गावडे यांनी धेणल्याची पुजा अर्चा केल्यानंतर धेंडलो श्री रामायसती देवस्थानकडे निघाला. त्यावेळी श्री रामायसती मंदिराजवळ पुजा अर्चा केल्यानंतर काही महिलांनी देवाला ओटी ओवाळली. त्यानंतर श्री रामपुरूष देवस्थानकडे आल्यानंतर समीर कामत यांनी देवाची पुजा केली.
तिवरे, माशेल, वरगाव, बेतकी, हडकोण, बाणस्तारी, प्रियोळ तसेच तिसवाडी भागातील कुंभारजुवे, डोंगरी, करमळी, माशेल, नेवरा, आजोशी या गावामध्येही धेणलोत्सवाची परंपरा उत्साहात साजरी करण्यात आली.









