वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी धवल कुलकर्णीची नियुक्ती करण्यात आली असून अतुल रानडे आणि भावेश शेट्टी यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून घोषणा मुंबई क्रिकेट संघटनेने मंगळवारी केली.
मुंबई क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी धवल कुलकर्णीवर सोपविण्यात आली होती. त्यांच्या करारामध्ये वाढ करण्यात आली आहे. 2023-24 च्या क्रिकेट हंगामात मुंबई संघाने विक्रमी 43 व्या रणजी करंडकावर नाव कोरले होते. तर गेल्या रणजी हंगामात त्यांना उपांत्यफेरीपर्यंत मजल मारता आली होती. धवल कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली मुंबई संघाने इराणी करंडक, विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली. तर सय्यद मुस्ताकअल्ली क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. मुंबई संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी ओंकार साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनीत इंदुलकर फलंदाज प्रशिक्षक असून अतुल रानडे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून राहील.









