जिल्ह्यातील प्रवाशांना अनुकूल : सप्टेंबर अखेरीस सुरू होणार
प्रतिनिधी / बेळगाव
धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे आता बेळगावपासून धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली. या रेल्वेमुळे बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना अनुकूल होणार आहे.
रेल्वे क्र. 17302 ही रेल्वे सायं. 7.45 वाजता बेळगावहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता म्हैसूरला पोहोचेल. तर रेल्वे क्र. 17301 म्हैसूरहून रात्री 10.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता बेळगावला पोहोचेल. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस सुरू होणार आहे, अशी माहिती कडाडी यांनी दिली आहे. तसेच ही रेल्वे बेळगावपासून सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.









