भारताचे माजी फिरकीपटू, निवडकर्ते सुनील जोशी यांचे प्रतिपादन, एनसीए कॅम्पची सांगता
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बीसीसीआयने भारतातील होतकरू मुला मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात 13 एनसीए कॅम्प विविध राज्यात, विविध शहरात सुरू केले आहेत. त्यामुळे पुढील वषी होणाऱया 19 वर्षाखालील मुलींच्या विश्वकप स्पर्धेसाठी संघ निवडण्यास सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे देशातील विविध राज्यातून आलेल्या गुणवंत खेळाडूंची चाचपणीही या कॅम्पद्वारे केली जात आहे, असे प्रतिपादन भारताचे ज्ये÷ डावखुरे गोलंदाज व निवड समितीचे सदस्य सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेत केले.
कर्नाटकात दोन कॅम्प बीसीसीआयने आयोजित केले होते. त्यामध्ये धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेकडे सोपविण्यात आले. धारवाड-हुबळीमध्ये मुलींचे कॅम्प व बेळगावमध्ये मुलांचे कॅम्प भरविण्यात आले आहेत.
बीसीसीआय कर्नाटक क्रिकेट संघटनेकडे स्पर्धा व कॅम्प्स भरवण्यासाठी प्राधान्य देते. संघटनेकडे सर्व सोयी सुविधा त्याचप्रमाणे आधुनिक मैदाने उपलब्ध असल्यामुळे दिली जातात, असे ते म्हणाले.
ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एनसीए 19 वर्षाखालील कॅम्पचे प्रमुख प्रशिक्षक ज्ये÷ क्रिकेटपटू शिवसुंदर दास, कर्नाटकाचे माजी क्रिकेटपटू व गोलंदाज प्रशिक्षक मन्सूर खान, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे चेअरमन विरण्णा सौदी आदी उपस्थित होते.
सुनील जोशी पुढे म्हणाले, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना ही महत्वपूर्ण संघटना असून, या विभागात 5 हजारहून अधिक साखळी सामने त्याचप्रमाणे 50 हून अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय सामने भरविले जातात. येथील वातावरण क्रिकेटपटूंसाठी पोषक असून, त्यामुळे कर्नाटक क्रिकेट संघटना धारवाड व बेळगावला प्राधान्य देत आहे. धारवाड व बेळगावची मैदाने परिपूर्ण असून येथे सरावही चांगल्या पद्धतीने घेतला गेला आहे. कॅम्पची संपूर्ण माहिती सर्व प्रशिक्षकांनी दिली असून, यापुढील काळातही बेळगाव व धारवाडला जास्त प्राधान्य दिले जाईल. जास्तीत जास्त रणजी सामने त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामनेही भरविण्यासाठी बीसीसीआयला सूचना करणार आहे.
यावेळी सुनील जोशी यांनी एनसीए कॅम्पमधील सहभाग झालेल्या सर्व क्रिकेटपटूंशी चर्चा करून वाटचालीसाठी सूचना केल्या. बीसीसीआयने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व क्रिकेटपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असे ते म्हणाले.
ज्ये÷ प्रशिक्षक शिवसुंदर दास, मन्सूर खान यांनी उपस्थितांना संबोधित केले. बेळगावसारख्या उत्तम पोषक वातावरणात एनसीए कॅम्प पूर्ण झाला आहे. याठिकाणच्या खेळपट्टय़ा या फलंदाजासाठी व गोलंदाजासाठी पोषक होत्या. परंतु सर्वात जास्त येथील वातावरणामुळे सर्व क्रिकेटपटूंनी कसून सराव केला. इतर कॅम्पमध्ये खेळाडूंना दुखापती व इतर आजार निर्माण होतात. पण, बेळगावात अशी एकही घटना झाली नाही. त्यासाठी बेळगावच्या मैदान कमिटी व स्टाफला धन्यवाद दिले.
यावेळी सर्व खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षकांकडून शुभेच्छा देवून कॅम्पची सांगता करण्यात आली. धारवाड येथे 19 वर्षाखालील मुलींच्या एनसीए कॅम्पचीही आज सांगता झाली असून त्या ठिकाणीही सुनील जोशींनी मार्गदर्शन केले.