किर्लोस्कर रोडवर वाहतूक कोंडी : सिमेंट काँक्रिटचे दुभाजक निर्माण करणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध चौकातील विकासाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र धर्मवीर संभाजी चौकातील दुभाजक नवीन करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी असलेले लोखंडी दुभाजक मोडकळीस आले असून दुभाजकामुळे किर्लोस्कर रोडवर वाहतूक कोंडी होत आहे.
धर्मवीर संभाजी चौकात किर्लोस्कर रोडवर लोखंडी दुभाजक उभारण्यात आले होते. मात्र हे दुभाजक पूर्णपणे मोडकळीस आले असून चौकातच पडले आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रिटचे दुभाजक निर्माण करणे गरजेचे होते. पण स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुभाजक उभारण्यात आले नाही. लोखंडी दुभाजकावरच काम चालविण्यात येत आहे. पण लोखंडी दुभाजक खराब झाले असून मोडून पडले आहे. दुभाजक रस्त्यावरच पडून असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. किर्लोस्कर रोडवर वाहनांची वर्दळ वाढली असताना या समस्येत भर पडली आहे. येथील समस्येची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









