श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने दि.21 फेब्रुवारी पासून महिनाभर धर्मवीर बलिदान आचरण करण्यात येतो. या दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे महाराजांना संपूर्ण महिनाभर त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दि.21 मार्चला मुकपद यात्रा काढून त्यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी दिला जातो. ही अग्नी ज्वाला रुपात सांगली येथे वढू बुद्रुक येथून आणली जाते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बेळगाव मधील धारकरी व शिवभक्त धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी सांगली येथे रवाना झाले होते. 25 धारकऱ्यांनी तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्या नियोजनाखाली या ज्वालेचे आज रविवारी सकाळी ठीक 7:30 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले. यावेळी या ज्वालेचे स्वागत जिल्हाप्रमुख किरण गावडे,शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील,तालुका प्रमुख परशराम कोकितकर यांनी केले.
यावेळेस अनंत चौगुले,किरण बडवाणाचे,अमोल केसरकर,विनायक कोकितकर, बाळू सांगूंकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दि 21 मार्च रोजी सकाळी ठीक 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून मुकपद यात्रा सुरु होणार आहे.










