वृत्तसंस्था/ दुबई
टी-20 विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी व गुरुवारी होणाऱया उपांत्य सामन्यांसाठी आयसीसीने पंचांची घोषणा केली आहे. ऍडलेडमध्ये गुरुवारी होणाऱया भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱया उपांत्य लढतीसाठी त्यांनी कुमार धर्मसेना व पॉल रॅफेल यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. ख्रिस गॅफनी हे या सामन्यातील तिसरे पंच असतील.
त्याआधी बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी होणाऱया न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या उपांत्य लढतीसाठी मरायस इरासमुस व रिचर्ड इलिंगवर्थ मैदानी पंच असतील तर रिचर्ड केटलबरो तिसऱया पंचाचे काम पाहतील. 13 नोव्हेंबर रोजी एमसीजीवर अंतिम लढत होणार असून उपांत्य लढतीच्या निकालानंतर अंतिम लढतीच्या पंचांची नियुक्ती केली जाणार असल्याचे आयसीसीने सांगितले.









