रायगड :
राज्य मार्गावरील पोलादपूर हद्दीतील कुंभळवणे गावाजवळ सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील धारकरी उमरठकडे येत असताना पिकअप उलटल्याने 20 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावातील धारकरी नरवीर भूमी उमरठ ते किल्ले रायगड गडतोक मोहिमेत सहभागी होण्यासाठी महाबळेश्वरमार्गे पोलादपूरकडे येत असतात. पिकअपवरील (एम.एच. 28 एए 4632) चालक रोहन तलवार (22) याचे अवघड वळण व उतारावर नियंत्रण सुटल्याने पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे गावाजवळ पिकअप उलटल्याने 20 धारकरी जखमी झाले. या जखमींना पोलादपूर ग्रामीण ऊग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण ऊग्णालयात व माणगांवसह इतर खासगी ऊग्णालयात हलविण्यात आले.
जखमांमध्ये अंकलखोप गावातील गणेश गायकवाड (19), अक्षय पाटील (25), सत्यम पुजारी (21), ओंकार खामकर (22), यश उपाध्ये (23), सागर हल्नलेली (27), पवनकुमार जाधव (17), योगेश खामकर (25), कुणाल उपाध्ये (17), अवधूत कुलकर्णी (28), पवन साळुंखे (18), ओम कोळी (19), आविष्कार शिंदे (19), संकेत जाधव (24), चालक रोहन तलवार (28), अथर्व अर्बा (25) व शंभू म्हस्के, क्लिनर अक्षय पाटील, प्रणव देशपांडे व विश्वंभर जोशी (16) यांचा समावेश आहे. या सर्व जखमींना पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी ऊग्णवाहिकेद्वारे पोलादपूर ग्रामीण ऊग्णालयात दाखल केले. पोलादपूर ग्रामीण ऊग्णालयात प्राथमिक उपचार करत सर्व जखमींना पुढील उपचारासाठी महाड माणगांवकडे हलविण्यात आले. या बाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात रात्री 2.30 च्या सुमारास अपघात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही केली.








