कोल्हापूर: खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत जाणार असल्याचे जाहीर होताच आज दोघांच्या घरासमोर पाच बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. खासदार धैर्यशील माने यांची काल ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यांनी प्रवाहा सोबत जाणार असल्याचे संकेत दिले होते. याची खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील घराचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ते सध्या भूविकास बँके शेजारी असणाऱ्या दिप्ती अपार्टमेंट येथे राहतात त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा- शरद पवारांनी पक्ष फोडला, शिवसैनिकांच्या वेदना सांगताना रामदास कदमांना अश्रू अनावर
‘आम्ही शिवसेनेसोबतच’ असे छातीठोकपणे सांगणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात गेले असून त्यामध्ये जिह्यातील हे दोन्ही खासदार सामील होणार आहेत. मुंबई येथील एका हॉटेलमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बारा खासदारांच्या ऑनलाईन बैठकीत खासदार मंडलिक आणि माने यांचा समावेश असल्याचे समजते. मंगळवारी दिल्ली येथे होणाऱ्या पत्रकार बैठकीत बंडखोर खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामध्ये जिह्यातील दोन्ही खासदारांकडून शिंद गटातील प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Previous Articleशिंदे गटात जाणाऱ्या 12 संभाव्य खासदारांची नावं आली समोर
Next Article बळ्ळारी नाल्यामुळे झालेली नुकसानभरपाई तातडीने द्या!









