विघ्नेश उपविजेता, दर्शन जी. उत्कृष्ट पोझर
बेळगाव : म्हैसूर येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व म्हैसूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चामराज चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत द. कन्नडच्या धनराजने आल्या पिळदार शरीराच्या जोरावर चामराज वडेयर हा मानाचा किताब पटकाविला. तर रेल्वेच्या विघ्नेशने पहिले उपविजेतेपद तर चित्रदुर्गच्या दर्शन जी. ने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. म्हैसूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चामराज वडेयर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास 150 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार 8 वजनी गटात घेण्यात आली.
55 किलो गट : 1) रोहित माळवी बेळगाव, 2) विशाल येळ्ळूरकर बेळगाव, 3) फर्दीन खान म्हैसूर, 4) दिपक भोसले चिक्कमंगळ्ळूर, 5) रेवण्णा म्हैसूर, 60 किलो वजनी गट : 1) आफताब किल्लेदार बेळगाव, 2) यलाप्पा कामकर बेळगाव, 3) दर्शन जी. चित्रदुर्ग, 4) रोनॉल्ड डिसोजा द.कन्नडा, 5) धनुष एम. बेंगळूर, 65 किलो वजनी गट : 1) धनंजय एम.पी दावणगिरी, 2)सोमशेखर कारवी उडपी, 3) रिकी बेंगळूर, 4) संजय के. दावणगिरी, 5) सचिन एस. उडुपी, 70 किलो वजनी गट : 1) विनय डोनकरी बेळगाव, 2) सत्यानंद भट म्हैसूर, 3) आदित्य काटकर बेळगाव, 4) राहुल कुलाल बेळगाव, 5) सतीश गौडा बेंगळूर, 75 किलो गट : 1)विघ्नेश रेल्वे, 2) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 3) नागेंद्र मडीवाळ बेळगाव, 4) क्लिंटन द. कन्नडा, 5) तापसकुमार नाईक चित्रदुर्ग, 80 किलो गट : 1) धनराज द. कन्नडा, 2) प्रशांत खन्नूकर बेळगाव, 3) महम्मद रियाज हासन, 4) वरूनकुमार व्ही. के. दावणगिरी, 5) रवीकुमार एस. बेंगळूर, 85 किलो गट : 1) प्रसाद बाचीकर बेळगाव, 2)विजय पी. डीबल्यूडी, 3) होस्टन ब्रॉची उडुपी, 4) महेश गवळी बेळगाव, 5) विक्रांत सातवणकर बेळगाव, 85 किलो वरील गट : 1) मंजुनाथ एस.जे. दावणगिरी, 2) गौतम उडपी, 3) अल्लाबक्ष तुमकूर, 4) जहरसिंग उडपी, 5) वरूण श्रीनिवास बेंगळूर यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर चामराज वडेयर किताबासाठी रोहित माळवी, आफताब किल्लेदार, धनंजय एम. पी., विजय डोणकरी, विघ्नेश धनराज, प्रसाद बाचीकर, मंजुनाथ एस. जे यांच्यात लढत झाली. धनराज व विघ्नेश यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये द. कन्नडच्या धनराजने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर चामराज वडेयर किताब पटकाविला. तर पहिले उपविजेतेपद रेल्वेच्या विघ्नेशने पटकाविले. बेस्ट पोझरच्या स्पर्धेत चित्रदुर्गच्या दर्शनने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. विजेत्या चामराज वडेयर धनराजला आकर्षक चषक, मानाचा किताब, रोख 30 हजार रूपये व प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पहिल्या उपविजेत्या विघ्नेशला आकर्षक चषक रोख 15 हजार रूपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी जे. डी. भट, गंगाधर एम., उमा महेश, किशोर, राघवेंद्र, बसवराज आरळीमठ, सतीश यांनी पंच म्हणून काम केले.









