प्रतिनिधी /बेळगाव
नवीन वर्षानिमित्त ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’तर्फे ‘धनलाभ- 2023’ ही नवीन मुदतठेव गुंतवणूक योजना संस्थेच्या सभासदांसाठी सादर करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या मर्यादित कालावधीसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे. लघु मुदतीत आकर्षक परतावा असे या योजनेचे स्वऊप असून योजनेचा कालावधी 13 महिन्यांचा आहे.
यात दहा हजार ऊपये आणि एक हजाराच्या पटीत सभासद गुंतवणूकदारांना रक्कम गुंतविता येणार आहे, ज्याला 9.20 टक्के इतका व्याज दर आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 0.50 टक्क्मयांच्या अतिरिक्त व्याजदराचा लाभ आहेच. सरळ व्याज तिमाही देण्यात येईल.
लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत किंवा 1800 2124050 या क्रमांकावर संपर्क साधून सभासद, गुंतवणूकदारांना या मुदतठेव योजनेचा लाभ घेता येईल. कमीत कमी कालावधी आणि आकर्षक व्याज दर असलेल्या या मुदतठेव योजनेमध्ये अधिकाधिक सभासदांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
लोकमान्य सोसायटीच्या विविध ठेव योजनांबरोबरच विमा सेवा, आरोग्य विमा, जीवन विमा, अत्यावश्यक बिले भरण्याची सुविधा, फास्टॅग, म्युच्युअल फंड, सोयीस्कर कर्ज योजना आदी सेवा-सुविधा संस्थेच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत. काही नियम व अटांनुसार ‘धनलाभ- 2023’ योजनेत मुदतपूर्व योजना बंद करण्याचा आणि ठेवींवर 90 टक्केपर्यंत कर्ज घेण्याची सोयदेखील आहे.
लोकमान्य सोसायटी नेहमीच ग्राहकांच्या सूचनांची अंमलबजावणी करून ग्राहकांच्या सोयीनुसार ठेव योजना अंमलात आणते. ‘धनलाभ-2023’ योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेस भेट द्यावी.









