वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा धनगर समाज संघटने मार्फत आज येथे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने पन्हाळा शाहूवाडीचे आ. डॉ. विनय कोरे यांची भेट घेतल्यावर त्यानी धनगर समाज आरक्षण जागरण साठी सर्वच पातळीवर पांठिंबा जाहिर केला.
धनगर आरक्षण जागर यात्रेची जनजागृतीची पत्रिका संयोजकांनी दिली. दरम्यान, डॉ. कोरे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असून यासंदर्भात कायदेशीर मार्गाने आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दर्शविणारे पत्र संघटनेला दिले. आरक्षण संदर्भात १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पट्टणकोडोली येथे आयोजित केला असून या मेळाव्यास आ. गोपीनाथ पडळकर मार्गदर्शन करणार आहेत असे सांगितले.
यावेळी शहाजी सिद, प्रा.राजेंद्र कोळेकर, भीमराव हराळे, पांडुरंग वगरे, लालासाहेब हिरवे, लिंबाजी हजारे, सोमाजी वाघमोडे, जगन्नाथ माने, डॉ दादासाहेब मरगाळे, पांडुरंग सिद, डॉ विजय गोरड, विक्रमसिंह वगरे, मारुती जानकर, प्रा. रघुनाथ सिद, अण्णासो सिद, पांडुरंग सिद उपस्थित होते.