ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये संपूर्ण राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कणखर आणि विकासात्मक भूमिका संपूर्ण देशाने स्वीकारली आहे.राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर असलेला विश्वास जनतेने दाखवला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांना जनतेने कौल दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही भाजपला चांगले यश मिळाले आहे.शिरोली-गांधीनगरमधील जनतेने तर महाडिक गटावर असलेले प्रेम आणि भाजपवरील विश्वास दाखवून,निर्विवाद विजय मिळवून दिला.जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील,असा कारभार ग्रामपंचायत ते केंद्र सरकारपर्यंतच्या पातळीवर होईल आणि भाजपचा जनाधार अधिकाधिक वाढेल,याची मला खात्री आहे. भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय जनता जनार्दनाचे असून,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आणखी दैदीप्यमान यश मिळवू.
Previous ArticleKolhapur : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुनेने केला, विद्यमान सरपंचाच्या पत्नीचा पराभव
Next Article आड़ाळी सरपंचपदी पराग गावकर









