प्रतिनिधी/रत्नागिरी
राज्य शासनाच्या गृहविभागाकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़. त्यानुसार रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यासाठी धनंजय कुलकर्णी (dhananjay kulkarni) यांची जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े. तर रत्नागिरीचे मावळते पोलीस अधीक्षक ड़ॉ. मोहितकुमार गर्ग (Dr. mohitkumar garg) यांची बदली करण्यात आली असून अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशी माहिती गृहविभागाकडून जारी करण्यात आली आह़े.
रत्नागिरीत काही वर्षापूर्वी कार्यरत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे याचे बॅचमेंट आहेत़. कुलकर्णी हे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील असून याच ठिकाणी त्यांचे 12 वीपर्यंतचे शिक्षण झाल़े. यानंतर कुलकर्णी यांनी कृषी पदवीधर परीक्षा प्राप्त केल़ी तर 1998 साली ते पोलीस उपअधीक्षक परीक्षा उत्तीर्ण करून सेवेला पारंभ केल़ा. यानंतर मागील अनेक वर्ष ते मुंबई येथे सेवा बजावत होत़े. 2014 ते 2016 पर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांचे ते अधिकृत प्रवक्ते म्हणून कार्य करत होत़े. मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढण्यात कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका पार पाडल़ी त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची दहशतवादविरोधी पथकाचे उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होत़ी.