- विजय देसाई
Dhananjay Chandrachud, who decided the power struggle, is tied to the soil of Sawantwadi!
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय खंडपीठाकडे आहे .या खंडपीठाचे नेतृत्व सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे आहे. धनंजय चंद्रचूड हे पुणे खेड तालुक्यातील असले तरी त्यांच्या घराण्याची नाळ सावंतवाडीशी आहे. त्यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थांनमध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या दरबारात दिवाण होते .राजांच्या अनुपस्थितीत न्यायदानाचे काम ते करत असत. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांना महात्मा गांधींनी रामराजा म्हणून गौरवले होते .त्या संस्थांनच्या काळात चंद्रचूड यांच्या आजोबांनी न्यायदानाचे काम केले होते. त्यांचे सुपुत्र यशवंत चंद्रचूड यांचे सावंतवाडी शिक्षण झाले .पुढे हे कुटुंबीय मुंबईला गेले .यशवंत चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश बनले. ते सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिले. त्यांनी अनेक खटल्यांचा निकाल दिला. यशवंत चंद्रचूड हे सावंतवाडी नाळ ठेवून होते. सावंतवाडी संस्थांनचेराजे शिवराम राजे भोसले यांनी त्यांचा सत्कारही केला होता यशवंत चंद्रचुड यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र धनंजय चंद्रचूड हे नोव्हेंबर 2022 ला देशाचे सरन्यायाधीश झाले .धनंजय चंद्रचूड यांनीही आपली नाळ सावंतवाडी कायम ठेवली .सावंतवाडी संस्थांनच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला धनंजय चंद्रचूड सावंतवाडीत आले होते. त्यांनी सावंतवाडीची नाळ कायम ठेवली. ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश बनले .न्यायदानाची तीन पिढ्यांची परंपरा चंद्रचूड घराण्याकडे आहे. या चंद्रचूड घराण्यातील सरन्यायाधीश असलेले धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्र आणि देशात महत्त्वाचा असलेला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा खटला सुनावणीसाठी आला .महाराष्ट्राचे आणि देशाचे या खटल्याकडे लोकशाहीच्या दृष्टीने लक्ष आहे. त्यामुळे या खटल्यात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे .जून महिन्यात सुरू झालेले सत्ता संघर्षाचे नाट्य देशाच्या राजकारणात खळबळ मोजणारे ठरले होते .शिवसेनेचा 56 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेच्या मुळावरच आणि अस्तित्वावर घाव घालणारे हे सत्ता संघर्षाचे नाट्य असल्यामुळे देशाचेही याकडे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात पाच सदस्य खंडपीठाकडे ही सुनावणी असून ती अंतिम टप्प्यात आहेत. गुरुवारी सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर शिवसेना कोणाची हे ठरणार आहे .देशाच्या राजकीय इतिहासात हा सत्ता संघर्षाचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणारा आणि राजकारणाला दिशा देणारा आहे. त्यामुळे जनतेचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे. त्यामुळे सर न्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा महत्त्वपूर्ण खटला आणि तोही देशातील महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राचा आणि देशाचे सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे महाराष्ट्रातील असल्यामुळे या खटल्याचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सावंतवाडीची नाळ असलेल्या चंद्रचूड घराण्याच्या धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर हा खटला असल्यामुळे सावंतवाडीकरांचे आणि जिल्हावासियाचे लक्ष याकडे लागले आहे या सत्ता संघर्षाच्या निकालात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांनी दिलेला सोळा आमदारांच्या अपात्रतेची निर्णय न्यायालय कायम ठेवते की पुन्हा न्यायालय अपात्रतेचा निर्णय पुन्हा तत्कालीन अध्यक्ष तथा उपसभापती झिरवल यांच्याकडे की विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









