ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Dhananjay Chandrachud 50th Chief Justice of the country न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना शपथ दिली. ते दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे मूळचे पुण्यातील कन्हेरसर गावचे. 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. 29 मार्च ते 31 ऑक्टोबर 2013 या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती.
अधिक वाचा : आम्ही राज्यात नवे उद्योग आणू; राणेंचं आश्वासन
अयोध्या, आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण यासारख्या अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. 2018 मध्ये चंद्रचूड यांनी व्याभिचाराला गुन्हा मानणाऱ्या कायद्याला रद्द केलं होतं. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं निर्णय दिला होता. त्यापैकी एक चंद्रचूड होते. व्याभिचार हा घटस्फोटाचा अधिकार असू शकतो पण गुन्हा नाही हा निकाल होता.









