वार्ताहर/धामणे
धामणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कन्नड व हिंदी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथील आरएलएसपी कॉलेजमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 45 माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे या स्पर्धा चुरशीने पार पडल्या. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये धामणे माध्यमिक विद्यार्थ्यांनी गीतगायन (कन्नड व हिंदी) या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. याबद्दल शाळेच्या एसडीएमसी कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.









