वार्ताहर /धामणे
येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री मारुती मंदिरांचा लोकार्पण सोहळा आजच्या दुसऱ्या दिवशीही अमाप उत्साहात पार पडला. शुक्रवार दि. 24 रोजी पहाटे 5 ते 7 या वेळेत मंदिरांची वास्तुशांती, होमपूजन, गोमाता प्रवेश होवून कळसारोहण गावच्या देवस्की पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले व मंदिरमध्ये पडल्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद घेण्यासाठी गाव व परिसरातील भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.
आज भिडे गुरुजींची उपस्थिती
शनिवार दि. 25 रोजी श्री मारुती मंदिर कळसारोहण, अभिषेक व होमपूजन पहाटे 5 वा. 45 ते सकाळी 8 वाजेपर्यंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी व गावातील युवकांच्याहस्ते मुर्तीला अभिषेक व पूजन होईल. बेळगाव परिसरातील शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि गावकऱ्यांतर्फे विविध कार्यक्रम होवून, दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. हभप हणमंत मिसाळे महाराज सांगली यांचे कीर्तन होईल. रविवारीही विविध कार्यक्रम होणार आहेत.









