वार्ताहर /धामणे
धामणे येथे शुक्रवार दि. 19 रोजी परसातील गवताची गंजी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने तानाजी भरमाणा मादाकाचे या शेतकऱ्याचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील बसवाण गल्ली दुसरा क्रॉस येथील शेतकऱ्याने आपल्या परसात शेतातील गवत आणून परसामध्ये गंजी घातली होती. परंतु दि. 19 रोजी दुपारी दोन वाजता रखरखत्या उन्हातच या गवतगंजीने अचानक पेट घेतला आणि ही गवतगंजी आगीच्या भस्मस्थानी पडली. शेजारील नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु कडाक्याचे ऊन आणि आगीच्या लोळांमुळे ही आग विझविणे शक्य झाले नाही. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.








