कोल्हापूर- निसर्गात कधी कोणता चमत्कार पाहायला मिळेल हें काही सांगता येत नाही. अशीच एक घटना जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली आहे. कळे येथे आसिफ जमादार यांच्या घरासमोर चक्क धामण जातीच्या सापाने गिळले असल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे प्राणीमित्र व सर्पमित्र चक्रावले असून भारतातील ही पहिलीच घटना असल्याचं दावा केला जात आहे.
याबाबत अशी माहिती की, कळे येथे राहणारे अशीच जमादार यांच्या घरी साप आल्याची माहिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन आणि रिसर्च सोसायटीच्या सभासदांना मिळाली. यात सोसायटीतले विकास पाटील, महादेव पाणारी,तानाजी पाटील, घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना धामण जातीच्या सापाने धामण जातीच्या सापाला मारून खात असल्याचे निदर्शनास आले. हे पाहून त्यांना धक्काच बसला इतिहासात नाग, कोब्रा,मण्यार हे साप इतर जातीच्या सापांना मारून खात असल्याच्या शास्त्रीय नोंदी उपलब्ध आहेत. आपल्याच कुळातील सापांना गिळल्याच्या नोंदी आहेत. धामण जातीच्या सापानेच धामण जातीच्या सापाला गेल्याची नोंद कुठेही नसल्याचं वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सैय्यद यांनी सांगितले. याची नोंद कुठेही नसल्याचं त्यांनी सांगितलं असून भारतातील ही पहिलीच घटना असावी त्यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









