प्रतिनिधी/ पणजी
पोलीस खात्यातील 53 कर्मचाऱयांना डीजीपी पदक जाहीर करण्यात आले आहे. कळंगूट पोलीस स्थानकाला या वर्षीचे प्रथम पारितोषिक, वेर्णा पोलीस स्थानकाला द्वितीय व पणजी पोलीस स्थानकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. ही पदके 20 डिसेंबर रोजी होणाऱया गोवा पोलीस रेझिंग डे कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. डीजीपी पदक जाहीर झालेल्यांमध्ये 1 अधीक्षक, 7 निरीक्षक, 4 उपनिरीक्षक, 15 साहाय्यक उपनिरीक्षक, 14 हवालदार व 12 कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.
अधीक्षक अभिषेक धनिया (आयपीएस), निरीक्षक मिरा डिसिल्वा, मेल्सन कुलासो, अर्जुन सांगोडकर, विक्रम नाईक, उदय गावडे, नितीन हळर्णकर, रामकृष्ण परब. उपनिरीक्षक दिलखूष देसाई, अरुणकुमार तळेकर, सत्यवान गावकर, ऋषिकेश पाटील, साहाय्यक उपनिरीक्षक सुनिल फाळकर, कृष्णा शेणॉय देसाई, नारायण गावस, दामोदर पेडणेकर, पॅलिक्स फर्नांडिस, प्रदीप गवस, बाबुराव उर्फ नितेश मडकईकर, कार्लोस पोन्टेस, संतोष गावकर, मग्दलेना डिसिल्वा, सुरेश गावस, अशोक मगेरी, दिलीप सिनारी, दयानंद अन्ननदाचे, महेश चोपडेकर, हवालदार दीपराज शेटय़े, राजेश नागवेकर, विष्णू गावस, पुंडलिक करमळकर, राजेश फडते, छाया गोडकर, संजना राऊत देसाई, सत्यजित पेडणेकर, दामोदर सुधीर, सिद्देश गवस, सचिन नाईक, सूर्यकांत पालयेकर, प्रवीण तुळसकर, अजित नाईक शिरोडकर, विदेश नाईक, कृष्णानन चोडणकर, कॉन्स्टेबल गौरेश सातर्डेकर, रविराज शेटय़े, सखाराम मांद्रेकर, चेतन तामसे, हर्षद नाईक, रामचंद्र साटेलकर, सुशांत पाटील, नितीन कामत, नारायण कोचरेकर, स्वराज नाईक यांचा समावेश आहे.









