देवरुख: देवरुख नजीकच्या ओझरेखुर्द गणेशवाडी येथे कोयता व विळ्याने केलेल्या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी काल रविवार (ता.१७) रोजी दोन जणांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रघुनाथ जागूष्ट्ये व साई सुभाष जागूष्ट्ये अशी आरोपींची नावे आहेत.
देवरुख पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संतोष विठोबा जागूष्ट्ये यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीत संतोष जागूष्ट्ये व विठोबा जागूष्ट्ये जखमी झाले आहेत.
हेही वाचा- इंदूरहून अमळनेरकडे येणारी बस नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
संतोष जागूष्ट्ये यांचे चुलते प्रकाश जागुष्ट्ये यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने संतोष जागूष्ट्ये यांच्या डाव्या खांद्यावर मुकामार देत डाव्या हाताच्या पंजावर वार केला. तसेच संतोष जागूष्ट्ये यांचे चुलत भाऊ साई जागूष्ट्ये व प्रकाश जागूष्ट्ये यांनी विठोबा जागुष्ट्ये यांच्या हातावर व खांद्यावर कोयत्याने व विळ्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी रविवारी रात्री ९ वाजता प्रकाश जागूष्ट्ये व साई जागूष्ट्ये यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संदेश जाधव करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









