प्रतिनिधी,देवरुख
Ratnagiri Crime News : क्रांतीनगर येथे देवरुख अपार्टमेंटमधील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी मुलालाच संशयित आरोपी म्हणून शुक्रवारी देवरुख पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. दीपक संसारे असे त्याचे नाव असून त्याला देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
देवरुख क्रांतीनगर येथे अपार्टमेंटमधील शारदा दत्तात्रय संसारे या वृद्धेचा खून झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. मात्र हा खून कोणी केला, का केला, या बाबत उलटसुलट तर्क सुरू होते. ३१ रोजी रात्रीपासून तपास करण्याचे काम देवरुख पोलीस यंत्रणेसह अन्य तांत्रिक पथके व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सुरू होते. – शारदा संसारे या वृद्धेचा डोक्यात घाव घालून टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकून देत खून करण्यात आला होता. या दरम्यान, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबची व्हॅन २-३० दिवस देवरूखात होती. तर, बुधवारी पुन्हा उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी देवरुख पोलीस स्थानकात भेट दिली होती.
खूनानंतर या बाबतची फिर्याद वृद्धेचा मुलगा दीपक यानेच दिली होती. आता शुक्रवारी दीपक यालाच संशयित आरोपी म्हणून देवरुख पोलिसांनी अटक केली आहे.
Previous Articleराज्यात आज तुळशी विवाह
Next Article गुणीरंग संगीत समारोहात गायन वादनाच्या मैफली रंगल्या









